Sunday, June 21, 2026
Homeदेसाईगंजट्रक आणि कारच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर वडिलांसह दोन मुले...

ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर वडिलांसह दोन मुले जखमी…-जखमी तसेच ठार झालेले देसाईगंज शहरातील; एकाला हलविले नागपूरला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- नागपूरहून लग्न समारंभ आटोपून परत येत असताना ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने दोन जण ठार,तर तिघे जखमी झाले.सदरची घटना आज,दिनांक-१० जुलै रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास नागभिड-ब्रम्हपुरी मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ घडली.

दिलीप परसवाणी वय ५५ वर्षे व महेक जितेंद्र परसवाणी वय ४२ वर्षे,दोघेही रा.देसाईगंज,जि. गडचिरोली अशी मृतांची नावे आहेत.या अपघातात जितेंद्र परसवाणी वय ४५ वर्षे आणि त्यांची दोन मुले गौरव परसवाणी वय १७ वर्षे व उदय परसवाणी वय १० वर्षे हे जखमी झाले आहेत.

देसाईगंज येथील पत्रकार जितेंद्र परसवाणी हे पत्नी महेक,दोन मुले गौरव व उदय आणि नातेवाईक दिलीप परसवाणी यांच्यासह नागपूरला नातेवाईकाच्या विवाहासाठी गेले होते.विवाह समारंभ आटोपून मध्यरात्री परत येत असताना नागभिड-ब्रम्हपुरी मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ त्यांची कार आणि ट्रक यांच्यात जोरदार टक्कर झाली.यात दिलीप परसवाणी आणि महेक जितेंद्र परसवाणी हे जागीच ठार झाले,तर जितेंद्र परसवाणी,गौरव परसवाणी व उदय परसवाणी हे जखमी झाले.तिघांनाही ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र,जितेंद्र परसवाणी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आज दुपारी नागपूरला हलविण्यात आले.सदर घटनेमुळे देसाईगंज शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य...

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!