Friday, September 4, 2026
Homeभंडाराजे अधिकारी राजकारण्यांना जुमानत नाही; त्यांना बदलीचा रस्ता..!

जे अधिकारी राजकारण्यांना जुमानत नाही; त्यांना बदलीचा रस्ता..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-प्रत्येक अधिकाऱ्याने राजकीय पुढाऱ्यांच्या प्रभावीखाली असावे,असा आजघडीचा शिरस्ता आहे. जे अधिकारी राजकारण्यांना जुमानत नाही,त्यांना बदलीचा रस्ता दाखविला जातो; अशी चर्चा खुद्द अधिकारी वर्गात नेहमीच असते.राजकारण्यांच्या प्रत्येक ‘हो’ ला ‘हो’ मिळविणारा टिकतो,अन्यथा बदली होते,असा सार्वत्रिक समज आहे.भंडारा जिल्ह्यात राजकीय त्रास अधिक आहे की हा जिल्हाच अधिकाऱ्यांना नको आहे,अशी दोन्ही बाजूने आता चर्चा सुरू झाली आहे.भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांची काल मंगळवारी बदली झाली.त्यांच्या जागी आता नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,जिल्ह्याला गेल्या दहा वर्षांत दहा जिल्हाधिकारी मिळालेत.यामुळे भंडारा जिल्ह्यात राजकीय त्रास अधिक आहे की, हा जिल्हाच अधिकाऱ्यांना नको आहे,अशी चर्चा आता सुरू झाली आहे.जिल्हाधिकारी पद हे सुमारे तीन वर्ष कालावधीचे असते.मात्र,भंडारा जिल्हा यास अपवाद ठरतो आहे.येथे बदली झाली की वर्ष-दीड वर्षच राहायचे बापू अन् उडून जायचे,असा संदेशच जणूकाही कक्षातील फलकावरच नोंदवल्या गेला की काय? अश्या चर्चांना उधाण आले आहे.भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांची ५ सप्टेंबर २०२४ रोजी नियुक्ती झाली होती.अश्यातच वर्ष होण्यापूर्वीच त्यांची बदली झाल्याने ‘आम्ही करू ती पूर्व दिशा’ असा प्रकार सर्वांच्या मुखी पडू लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!