Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजपीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यशाळा..

पीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यशाळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-मुली वयात येतांना त्यांच्यात शारीरिक व मानसिक बदल होत असतो.त्यामुळे अनेकजण याबाबत अनभिज्ञ असतात.केव्हा -केव्हा चिडचिडेपणा सामाजिक व कौटुंबिक नाती यात दुरावा निर्माण होत असतो.त्यामुळे शालेय जीवनापासूनच मुलींना संपूर्ण बाबींची जाणिव तथा माहिती असावी, यासाठी देसाईगंजच्या जुनी वडसा येथील पीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.किशोरवयीन मुलींचे आरोग्य, मानसिक विकास व आत्मविश्वास वाढीसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कु.वनिता आढाऊ समुपदेशिका ग्रामीण रुग्णालय देसाईगंज यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेत आपल्या शंकांचे निरसन केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता डोंगरे टीबी हेल्थ विजिटर ग्रामीण रुग्णालय देसाईगंज यांनी उपस्थित राहून किशोरवयीन मुलींना आरोग्य,स्वच्छता, आहार आणि सामाजिक जाणीव याबाबत माहिती दिली.या कार्यशाळेस शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण, शिक्षक मुजाहिद पठाण,राजेश मडावी,शिवराम हाके,राहुल भैसारे,राहुल मस्के,शिक्षिका खरकाटे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु.टीना ठाकरे हिने केले तर आभार प्रदर्शन इयत्ता सहाव्या वर्गाची विद्यार्थिनी वंशिका तरारे हिने मानले.अशा प्रकारच्या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास,आरोग्याविषयी जागरूकता आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित होतो,असा संदेश  कार्यशाळेतून देण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!