चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सिर्सी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-१५३४(संरक्षित वन) परिसरात मोहाफुले वेचण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच लोंढोली गावातील वनमाला मोरेश्वर घोंगडे वय ३८ वर्षे,उमेश नरेंद्र घोंगडे वय २५ वर्षे व भूपेंद्र नीलकंठ खोबे वय २५ वर्षे या तिघांविरुद्ध वनविभागाने गुन्हा नोंदवला आहे.सिर्सीचे वनरक्षक हे आपल्या प्राथमिक बचाव पथकासह (पीआरटी)नियमित जंगल परिसरात गस्तीवर असतांना शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी तिघांनी जंगलात आग लावल्याचे निदर्शनास आले.आग लावून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतांना वनकर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.त्यानंतर, त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला.प्रकरणात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ३३(ड) अंतर्गत दोन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.तसेच आगीमुळे वन्यजीव व जैवविविधतेचे मोठे नुकसान झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९ अंतर्गत तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.सदरची कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तलमले,सहाय्यक उपवनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र सहाय्यक मारुती पुल्लेवाड पुढील तपास करीत आहेत.कारवाईदरम्यान सिर्सीचे वनरक्षक महादेव मुंडे,गायडोंगरीचे वनरक्षक एकनाथ खुडे,उपरीचे वनरक्षक डांगे,नवेगावचे वनरक्षक सुषमा मेश्राम तथा पीआरटीच्या पथकानी सहकार्य केले.
जंगल परिसरात आग लावणाऱ्या तिघांवर वन गुन्हे दाखल..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

