Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीआज तब्बल नऊ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

आज तब्बल नऊ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गेल्या अनेक दशकापासून जंगल परिसरात दारोदार भटकून हिंसक कारवाया,जाळपोळ, हत्या व इतर गनिमी काव्याने उपद्रव माजविणाऱ्या नक्षली संघटनेने सर्व मागील कारनामे मागे सोडून आता संविधानाचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र दिसू लागले आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील संपूर्ण नक्षलवादाचे ३१ मार्च २०२६ पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचा निर्णय घेतलेला असतांनाच आज,मंगळवार ३१ मार्च रोजी तब्बल नऊ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दल व केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केले.दसरी उर्फ पिडे सन्नू वेको वय ३५ वर्षे,रामजी अडमा पोटाम वय ४० वर्षे व शांती वंजा वड्डे वय ४० वर्षे तिन्ही नक्षली क्षेत्रिय समिती(एसीएम)सदस्य होते.तर मनकू पोड्याम,सरिता वेलकम,लखमी कुंजाम,नंदे मडे,राकेश मज्जी व सुक्की कुंजाम अशी अन्य आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे असून शासनाने या सर्वांवर ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधील इंद्रावती क्षेत्रिय समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रिय समितीत कार्यरत होते.सध्या गडचिरोली जिल्ह्यात सहा सशस्त्र नक्षली शिल्लक आहेत.त्यातील,जयराम गावडे हा एकमेव सदस्य गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असून,अन्य पाचजण छत्तीसगडचे रहिवासी आहेत.मात्र,त्यांच्या कुठल्याही हालचाली गडचिरोली जिल्ह्यात दिसत नसल्याचे गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले.शांती वंजा वड्डे हिने एके-४७ रायफल आणि जिवंत काडतुसांसह,तर सुक्की कुंजाम हिने कार्बाईन रायफलसह आत्मसमर्पण केले.त्याचबरोबर,महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कुमनार आणि गुंडापुरी जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.यात एके-४७, एसएलआर, डेटोनेटर,वॉकीटॉकीसह इतर साहित्यांचा  समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!