Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरजंगल परिसरात आग लावणाऱ्या तिघांवर वन गुन्हे दाखल..

जंगल परिसरात आग लावणाऱ्या तिघांवर वन गुन्हे दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड  उपवनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सिर्सी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-१५३४(संरक्षित वन) परिसरात मोहाफुले वेचण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच लोंढोली गावातील वनमाला मोरेश्वर घोंगडे वय ३८ वर्षे,उमेश नरेंद्र घोंगडे वय २५ वर्षे व भूपेंद्र नीलकंठ खोबे वय २५ वर्षे या तिघांविरुद्ध वनविभागाने गुन्हा नोंदवला आहे.सिर्सीचे वनरक्षक हे आपल्या प्राथमिक बचाव पथकासह (पीआरटी)नियमित जंगल परिसरात गस्तीवर असतांना शनिवार,२८ मार्च २०२६ रोजी तिघांनी जंगलात आग लावल्याचे निदर्शनास आले.आग लावून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतांना वनकर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.त्यानंतर, त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला.प्रकरणात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ३३(ड) अंतर्गत दोन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.तसेच आगीमुळे वन्यजीव व जैवविविधतेचे मोठे नुकसान झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९ अंतर्गत तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.सदरची कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तलमले,सहाय्यक उपवनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली  सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र सहाय्यक मारुती पुल्लेवाड पुढील तपास करीत आहेत.कारवाईदरम्यान सिर्सीचे वनरक्षक महादेव मुंडे,गायडोंगरीचे वनरक्षक एकनाथ खुडे,उपरीचे वनरक्षक डांगे,नवेगावचे वनरक्षक सुषमा मेश्राम तथा पीआरटीच्या पथकानी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!