Friday, May 1, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर पोलीस भरती; १९ जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू..-उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या...

चंद्रपूर पोलीस भरती; १९ जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू..-उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये-पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चंद्रपूर पोलिस दलातील १३७ पोलिस शिपाई व ९ बॅण्ड मॅनच्या पदासाठी १९ जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू होणार आहे;अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली.विशेष बाब म्हणजे यंदा पोलिस भरतीची प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.पोलिस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पावसाची शक्यता बघता उमेदवारांची शारीरिक चाचणी जिल्हा क्रीडा संकुलात होईल. तत्पूर्वी उमेदवाराची उंची व छातीचे मोजमाप केले जाईल. त्यांची कागदपत्रे तपासल्यांनंतर त्यांना आत प्रवेश दिला जाईल.त्यांनतर शारीरिक चाचणीमध्ये पुरुषाच्या १०० मीटर,१६०० मीटर व महिलांची १००,८०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल.

जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर उमेदवारांना स्पोर्ट शूज वापरण्यास मुभा देण्यात येईल.पोलिस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी; यासाठी RFID पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होणार असून उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडता स्वतः गुणवत्ता सिद्ध करीत या प्रक्रियेत सहभाग घ्यावा; असे आवाहन मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रियेत उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करणार नाही; असे हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेतले जाणार आहे.या आदेशाचे पालन न केल्यास उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.भरती प्रक्रियेसाठी काही उमेदवार १ किंवा २ दिवसापूर्वी दाखल होतात.त्यांना उघड्यावर कुठेही रहावे लागू नये; यासाठी त्यांची व्यवस्था पोलिस मुख्यालय येथील ड्रील शेडमध्ये करण्यात आली आहे.

बाहेरील किंवा इतर कर्मचारी उमेदवारांना पोलिस दलात नोकरी लावून देत असल्याचे आमिष देत असतील तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करावी; असे आवाहन मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.महिनाभर चालणाऱ्या या भरती प्रक्रियेदरम्यान पावसामुळे व्यत्यय आल्यास उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख कळविण्यात येईल; असेही सांगण्यात आले.पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू उपस्थित होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!