Friday, October 16, 2026
Homeनागपूरनागपुरात भर दुपारी पावसाची जोरदार बॅटिंग; दिवसाच पडला अंधार..

नागपुरात भर दुपारी पावसाची जोरदार बॅटिंग; दिवसाच पडला अंधार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- नागपूरमध्ये भर दुपारी काळोख दाटून आले.वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.दिवसाच अंधार पडल्याने वाहनांना दिवे लावून वाहने चालवावी लागली.शहर आणि परिसरात दुपारी तीन वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

आज,सोमवारी १७ जून रोजी दुपारी नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु झाला. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागकडून यलो अलर्ट दिला होता; परंतु हा मान्सूनचा पाऊस नसून सर्वसाधारण परिस्थितीमुळे तयार झालेले ढग असल्याचे हवामान विभागाने  कळविले आहे.

हवामान विभागानुसार,मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले नसल्याने अजून पूर्व विदर्भात मान्सूनचा पाऊस आलेला नाही.आज,सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.जोरदार सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला.

नागपूर शहरामध्ये मागील काही दिवसांपासून ४१ अंशांच्या वर तापमान गेले होते.सोमवारी झालेला पाऊस हा नक्कीच उकाड्यापासून दिलासा देणारा आहे.मात्र शेतकऱ्यांना अजूनही मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे.शहरामध्ये अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!