Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपुरात भर दिवसा अज्ञात युवकांनी मनसे कामगारसेना जिल्हाध्यक्षांवर केला गोळीबार…-पाठीवर लागली गोळी…

चंद्रपुरात भर दिवसा अज्ञात युवकांनी मनसे कामगारसेना जिल्हाध्यक्षांवर केला गोळीबार…-पाठीवर लागली गोळी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-चंद्रपुरातील मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला आहे.ही घटना शहरातील मध्यवर्ती भागातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे आज,गुरुवारी दि.४ जुलै रोजी घडली.अन्देवार यांच्या पाठीवर गोळी लागली असून पोलिसांनी त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलवित  आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची माहिती आहे.८ ऑगस्ट २०२० मध्ये दारू व्यवसायाच्या वर्चस्वातून बल्लारपूर शहरात सूरज बहुरिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.पोलिसांनी त्या प्रकरणात अमन अन्देवार आणि आकाश अन्देवार याला अटक केली होती.२०२१ मध्ये आकाश अन्देवार याची जामिनावर सुटका झाली होती.त्यानंतर १२ जुलै २०२१ मध्ये आकाश अन्देवार यांच्यावर रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये बहुरिया समर्थकांनी गोळीबार केला होता.आकाशला त्यावेळी ३ गोळ्या लागल्या पण सुदैवाने तो बचावला होता.मात्र,अन्देवार बंधूंनी बहुरिया यांची हत्या केल्याने त्यांना संपविल्याशिवय स्वस्थ बसणार नाही; अशी भूमिका बहुरिया समर्थकांनी घेतली होती.

आज गुरूवारी दुपारी अमन अन्देवार हे मित्राच्या कार्यालयात रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये येत असताना अचानक २ युवक त्या ठिकाणी आले.एक युवक हा वाहनाजवळ थांबला होता तर दुसऱ्याने अन्देवार यांच्यावर गोळी झाडली आणि पळ काढला.जुन्या वादातून अन्देवार यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.सदर घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली.पोलीसांनी घटनास्थळी गाठून जखमी अन्देवार यांना ताब्यात घेवून तातडीने उपचारार्थ नागपूरला हलविले आहे. पोलिसांनी परिसरात आरोपीच्या शोधार्थ मोहीम राबविली,परंतु आरोपींचा शोध लागला नाही.या घटनेमुळे रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.सदर घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!