Saturday, April 18, 2026
Homeभंडाराघराचे बांधकामावर पाणी टाकण्यासाठी विहिरीजवळ गेलेल्या इसमाचा तोल जाऊन विहिरीत बुडून मृत्यू...

घराचे बांधकामावर पाणी टाकण्यासाठी विहिरीजवळ गेलेल्या इसमाचा तोल जाऊन विहिरीत बुडून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-बांधकाम सुरू असलेल्या घरावर पाणी मारण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार दिनांक-३ डिसेंबरला सकाळी लाखांदूर/प्लॉट येथे घडली. मानबिंदू विश्वनाथ दहीवले वय ४८ वर्षे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मानबिंदू यांनी काही महिन्यांपूर्वी लाखांदूर (प्लॉट) येथे स्वत:च्या घराचे बांधकाम सुरू केले होते.त्या अनुषंगाने ते दररोज सकाळी घरावर पाणी टाकण्यासाठी विहिरीतून पंपाच्या साहाय्याने पाणी द्यायचे.आज सकाळी पाणी टाकण्यासाठी गेले असता अचानक तोल जाऊन ते विहिरीत पडले.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!