Sunday, August 9, 2026
Homeचंद्रपूरघरकुलाचे बांधकाम न करताच उचलले लाखो रुपये.. - दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल...

घरकुलाचे बांधकाम न करताच उचलले लाखो रुपये.. – दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शासन स्तरावरून सध्याच्या घडीला सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर घरकुले देण्यात येत आहेत.सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या घरकुल बांधकामांचा ग्रामीण भागात सपाटा सुरू करण्यात आला आहे.दीड लाख रुपये वा दोन लाख रुपयांमध्ये संपूर्ण घराचे बांधकाम होत नसते.मात्र,शासन स्तरावरून देण्यात येणारी रक्कम ही लाभार्थ्यास थोडीफार मदत म्हणून देण्यात येते.अश्यातच ज्यांना आवश्यक आहे,अश्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात नाही.तर भलत्याच लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे.पण,ज्याला घरकुल मिळाले,अश्या लाभार्थ्याने घरकुलाचे बांधकाम न करताच लाखो रुपये उचलले असल्याचा प्रकार हल्ली चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या वडसी येथे उघडकीस आल्याने परिसरात एकच चर्चेचा विषय ठरू लागला आहे.प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुरारी पांडुरंग खोब्रागडे यांनी केली आहे.
माहितीनुसार,वडसी गावातील विशाल जयपाल गजभिये यांना रमाई आवास योजने अंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात घरकुल मंजूर झाले. तत्पूर्वी सन २०१८-१९ ला विशालचे वडील जयपाल गजभिये यांना रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुल मिळाले होते.त्यानुसार जयपाल यांनी बांधकाम पूर्ण करून निधीची उचल केली.अश्यातच मुलगा विशाल याला घरकुल आल्यानंतर घराचे बांधकाम न करताच  १ लाख १० हजार रुपयांचा निधी उचलल्याची बाब सर्वत्र पसरली.त्यानुसार सदरचे प्रकरण मुरारी खोब्रागडे यांना माहीत होताच त्यांनी हे प्रकरण उचलून धरले व ग्रामपंचायत तसेच घरकुल अभियंता यांना माहिती दिली.कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याने खोब्रागडे यांनी बिडीओ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे कारवाईची मागणी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!