Sunday, August 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'नियाद नेलनार' योजनेने प्रभावित होऊन १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

‘नियाद नेलनार’ योजनेने प्रभावित होऊन १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नक्षली हिंसक कारवाया सोडून पुढील जीवन आल्हाददायी जगण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका महिलेसह एकूण १६ नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज,सोमवार २ जून रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.राज्य सरकारच्या ‘नियाद नेलनार’ (तुमचे चांगले गाव) योजनेने प्रभावित होऊन या सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.छत्तीसगड राज्य सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत नक्षलमुक्त ग्रामपंचायतीला विकास प्रकल्पांसाठी एक कोटी रुपये देखील देण्यात येणार आहेत.या योजने अंतर्गत, नक्षलमुक्त गावांमध्ये विकास कामे सुलभ केली जाणार आहेत.सर्व नक्षलवाद्यांवर एकूण २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.यापैकी दोघांवर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस होते.त्यापैकी एक ३६ वर्षीय रीता उर्फ दोडी सुक्की आणि १८ वर्षीय राहुल पुनीम यांच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. याशिवाय,२८ वर्षीय लेकम लखमा वर तीन लाख रुपये आणि इतर तीन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी २ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते.यापैकी ९ नक्षलवादी हे चिंतलनार पोलीस स्टेशन परिसरातील केरळपेंडा गावातील रहिवासी होते.त्यांच्या आत्मसमर्पणामुळे ही ग्रामपंचायत पूर्णपणे नक्षलमुक्त झाली आहे.यापूर्वी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बडेसट्टी ग्रामपंचायत नक्षलमुक्त घोषित करण्यात आली होती.आज सोमवारी पार पडलेल्या आत्मसमर्पण कार्यक्रम प्रसंगी एसपी किरण चव्हाण, एसएसपी उमेश गुप्ता आणि सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!