- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शासन स्तरावरून सध्याच्या घडीला सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर घरकुले देण्यात येत आहेत.सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या घरकुल बांधकामांचा ग्रामीण भागात सपाटा सुरू करण्यात आला आहे.दीड लाख रुपये वा दोन लाख रुपयांमध्ये संपूर्ण घराचे बांधकाम होत नसते.मात्र,शासन स्तरावरून देण्यात येणारी रक्कम ही लाभार्थ्यास थोडीफार मदत म्हणून देण्यात येते.अश्यातच ज्यांना आवश्यक आहे,अश्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात नाही.तर भलत्याच लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे.पण,ज्याला घरकुल मिळाले,अश्या लाभार्थ्याने घरकुलाचे बांधकाम न करताच लाखो रुपये उचलले असल्याचा प्रकार हल्ली चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या वडसी येथे उघडकीस आल्याने परिसरात एकच चर्चेचा विषय ठरू लागला आहे.प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुरारी पांडुरंग खोब्रागडे यांनी केली आहे.
माहितीनुसार,वडसी गावातील विशाल जयपाल गजभिये यांना रमाई आवास योजने अंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात घरकुल मंजूर झाले. तत्पूर्वी सन २०१८-१९ ला विशालचे वडील जयपाल गजभिये यांना रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुल मिळाले होते.त्यानुसार जयपाल यांनी बांधकाम पूर्ण करून निधीची उचल केली.अश्यातच मुलगा विशाल याला घरकुल आल्यानंतर घराचे बांधकाम न करताच १ लाख १० हजार रुपयांचा निधी उचलल्याची बाब सर्वत्र पसरली.त्यानुसार सदरचे प्रकरण मुरारी खोब्रागडे यांना माहीत होताच त्यांनी हे प्रकरण उचलून धरले व ग्रामपंचायत तसेच घरकुल अभियंता यांना माहिती दिली.कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याने खोब्रागडे यांनी बिडीओ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे कारवाईची मागणी केली आहे.
- Advertisement -

