- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-लाडबोरी शेतशिवारातील रमेश पांडुरंग गंडाईत,रा.सिंदेवाही यांच्या शेतीला लागून असलेल्या सरकारी नाल्याजवळ सिंदेवाही वनपरिक्षेत्रात काल, गुरुवारी २ सकाळच्या सुमारास नियमित गस्तीदरम्यान एक वाघ मृतावस्थेत आढळून आला.
माहिती प्राप्त होताच अधिनस्त क्षेत्र सहायक एन.टी. गडपायले,वनरक्षक फुलझले व वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले.सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली.त्यानंतर घटनास्थळावर ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहायक वनसंरक्षक एम.बी.चोपडे,महेश गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे,बंडू धोत्रे आदींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
मृत वाघ नर व वयोवृद्ध असल्याचे प्राथमिक निरीक्षणावरून दिसून आले.वाघाचे सर्व अवयव शाबूत होते,त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून घटनास्थळीच शवविच्छेदन करून उत्तरीय तपासणीकरिता व्हीसेरा घेण्यात आला व तो प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.वाघाचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला असावा,असा अंदाज आहे. तरीही प्रयोगशाळेतून अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाघाचा मृत्यू कशामुळे झाला,हे स्पष्ट होणार आहे.
- Advertisement -

