गोंदिया :-अगोदरच घरकुल बांधकामासाठी शासनाकडून तुटपुंजे अनुदान दिले जाते.अशातही लाभार्थ्यांकडून पैश्याची मागणी केली जात असेल तर यांच्या सारखे महामूर्ख मानव जगात कुणीही नाही; असेच म्हणावे लागेल.चक्क एका शेतमजूर व्यक्ती कडून घरकुलाचा हप्ता जमा झाल्याने घरकूल लाभार्थ्याकडून १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कंत्राटी कनिष्ठ अभियंता व त्याच्या दोन साथीदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी १ जानेवारीला लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे.कंत्राटी गृहनिर्माण अभियंता प्रमोद बीरसिंग उपवंशी वय ३८ वर्षे,पंचायत समिती गोंदिया, रा.शारदा कॉलनी,कुडवा,ग्रामपंचायत शिपाई धनंजय मुन्नालाल तांडेकर वय ४५ रा.कामठा, खासगी व्यक्ती विश्वनाथ गोविंदराव तरोणे वय ६२ वर्षे,रा.लहरी आश्रम रोड,कामठा असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यासह ग्रामपंचायत शिपाई व खासगी व्यक्ती अडकला एसीबीच्या जाळ्यात… – घरकुल बांधकाम अनुदानातून मागितली १० हजाराची लाच…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
तक्रारदार शेतमजुरी करीत असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले.दरम्यान, घरकुलाच्या अनुदानाचा पहिला हप्ता १५ हजार रुपये त्यांच्या खात्यात वळती झाल्याचे आरोपी धनंजय तांडेकर याने तक्रारदाराला कळविले.या आधारावर त्यांनी घरकुलाचे बांधकाम चालू केले व पायाभरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर धनंजय तांडेकर यास कळविले. यानंतर २७ नोव्हेंबर २०२४ रोजी कंत्राटी गृहनिर्माण अभियंता प्रमोद उपवंशी व ग्रामपंचायत शिपाई धनंजय तांडेकर यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन घराच्या बांधकामाचे फोटो काढले.तक्रारदाराच्या मुलाला घरकुलाच्या अनुदानाची उर्वरित रक्कम वर्ग करणार असून त्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची मागणी केली.२१ डिसेंबरला तक्रारदाराला फोन करून अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचे ७० हजार खात्यात वर्ग केल्याचे सांगून १० हजार रुपये तांडेकर याच्याकडे देण्यास सांगितले होते.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक सापळा रचून रंगेहाथ पकडले.सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम,संजय पुरंदरे, पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उपअधीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उमाकांत उगले,सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे,पोलिस हवालदार संजय कुमार बोहरे,मंगेश काहालकर, नायक पोलिस शिपाई संतोष शेंडे,संतोष बोपचे, अशोक कापसे,प्रशांत सोनेवाणे,महिला नायक पोलिस शिपाई संगीता पटले,रोहिणी डांगे,चालक नायक पोलिस शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

