Friday, September 4, 2026
Homeनागपूररेस्टॉरंट चालकाला बेदम मारहाण व केस डायरी चोरून नेल्या प्रकरणी दोन पोलीस...

रेस्टॉरंट चालकाला बेदम मारहाण व केस डायरी चोरून नेल्या प्रकरणी दोन पोलीस निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-सीताबर्डी पोलिस ठाण्यात रेस्टॉरंट चालकाला बांधून बेदम मारहाण करणारे कॉन्स्टेबल प्रवीण वाकोडे आणि समाधान कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी ही कारवाई केली आहे.सदर केलेल्या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वेस्ट हायकोर्ट रोडवरील फर्जी कॅफेमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टीदरम्यान एका रेस्टॉरंटचे संचालक सायरस चेंगचा एका महिलेशी वाद झाला. महिलेने सायरसविरुद्ध तक्रार केली.याचा तपास महिला पीएसआय कविता जगताप करीत होत्या.अशातच वाकोडेने पोलिस ठाण्याच्या कपाटातून केस डायरी चोरून स्वतः तपास सुरू केला.सायरसलाही त्याने १ जानेवारीला पोलिस ठाण्यात आणले.सायरसला केबिनमध्ये बांधून समाधान कांबळे याच्या मदतीने मारहाण करण्यात आली.कारवाई टाळायची असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील,असे वाकोडेने सांगितले.दरम्यान,केस डायरी चोरीला गेल्याने पोलिस ठाण्यात खळबळ उडाली.कारवाईच्या भीतीने दुसरी केस डायरी तयार करण्यात आली.सायरस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर याची चौकशी करण्यात आली.प्राथमिक तपासात या घटनेची पुष्टी झाल्यानंतर दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!