Friday, September 4, 2026
Homeनागपूरकुठे गेली कर्ज माफी अन् कुठे गेले एकवीसशे रुपये...- विजय वडेट्टीवार

कुठे गेली कर्ज माफी अन् कुठे गेले एकवीसशे रुपये…- विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शेतकऱ्यांच्या भरवशावर निवडणूक जिंकल्याचा दावा करणाऱ्या महायुती सरकारने आता दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी द्यावी तसेच लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये द्यावेत; अशी मागणी करीत कुठे गेली कर्ज माफी अन् कुठे गेले एकवीसशे रुपये असे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात महायुती सरकारवर टोला लगावला.महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात मते टाकली.या जनमताचा सन्मान करणे सरकारचे काम आहे.लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची मदत देण्याची घोषणा या सरकारने केली होती.तसेच सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे सांगितले होते.आता याबाबत तडक निर्णय कां घेतला जात नाही? असाही सवाल त्यांनी केला.धान खरेदीची मुदत संपली आहे.ती वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत.बाकीचे मंत्री सध्या कोमात गेल्यासारखे वाटतात.अनेकांनी तर अजून पदभार स्वीकारलेला नाही.बंगला वाटपावरून,अधिकार आणि खात्यावरून भांडण सुरू आहे,असे ते म्हणाले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे आहेत. त्यामुळे त्यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्री नेमले असले तर कोणाची हरकत असण्याचे कारण नाही.जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत.मात्र,पालकमंत्री नेमले जात नाही. काय चालले आहे; हेच कळत नाही,असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ जानेवारीला सर्व जिल्ह्यांत तिरंगा फडकवावा,असाही टोला त्यांनी लगावला आहे.बीडचे पोलिस प्रमुख किंवा जिल्हाधिकारी नेमतांना मर्जीतला माणूस दिला जातो. कराडाला बाप मानून पोलिस वागत होते.२२ दिवस त्याला पोलिस पकडू शकले नाही.यात गृह खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे.याकडे लक्ष दिले नाही तर पोलिस खात्याचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!