Thursday, May 28, 2026
Homeभंडाराखबरदारीचा उपाय म्हणून गोसेखुर्द धरणातून सोडले पाणी.. - नदीकिनारी गावांमधील नागरिकांना सतर्क...

खबरदारीचा उपाय म्हणून गोसेखुर्द धरणातून सोडले पाणी.. – नदीकिनारी गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-पुढील येत्या काळात मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय असल्याने सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि वैनगंगेच्या खोऱ्यात कधीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.भविष्यात वैनगंगेच्या खोऱ्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास वैनगंगा आणि भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे संभाव्य पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि धरण प्रकल्पात पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार काल,शुक्रवार २० जून रोजी सायंकाळी ६ वाजतापासून गोसेखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.वैनगंगा नदीत ८० क्युमेक (८० हजार लिटर प्रति सेकंद) पाणी सोडण्यात आले आहे.प्रकल्पाच्या पॉवर हाऊस गेटमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यामुळे धरणाच्या पलिकडच्या बाजूला वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढू शकते.त्यामुळे नदीकिनारी लगतच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या स्थितीत गोसेखुर्द धरण तुडुंब भरलेला आहे.त्यामुळे येत्या काळातील खबरदारीचा उपाय म्हणून हा प्रकल्प रिकामा करून ठेवला जात आहे.गोसीखुर्द प्रकल्पामध्ये सध्या ११०.१५४ दशलक्ष घनमीटर (१४.८८ टक्के) पाण्याचा जिवंत साठा असून काल शुक्रवारी सकाळी धरणाची पाणीपातळी २४१.६४० मीटर नोंदवल्या गेली.त्यानुसार सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!