Monday, July 27, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा युवा वीर मराठा मंडळातर्फे विविध स्पर्धेचे आयोजन….-आज पासून जय्यत तयारी…

कोंढाळा युवा वीर मराठा मंडळातर्फे विविध स्पर्धेचे आयोजन….-आज पासून जय्यत तयारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा युवा वीर मराठा मंडळातर्फे येत्या १९ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने ११ फेब्रुवारी  पासूनच जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

येणाऱ्या जयंती दिनाचे औचित्य साधून  स्पर्धांचे आयोजन करून १८ फेब्रुवारीला बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याने आतापासूनच विद्या निकेतन लोकमान्य टिळक शाळेत विद्यार्थ्यांसाठी  विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.स्पर्धेच्या सुरुवातीला गावातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर विविध स्पर्धेस सुरुवात करण्यात आली.स्पर्धेत चित्रकला,निबंध,वकृत्व, सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आले यावेळी तालुक्यातील १७८  विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.घेण्यात आलेल्या स्पर्धे मद्ये देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता या दरम्यान ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितिन राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,सुनील पारधी भाजपा तालुकाध्यक्ष, नितीन राऊत माजी उपसभाती, अनिल मुलकलवार मुख्यधापाक जिल्हा परिषद शाळा,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार, प्रदीप तुपट,एन.आय.आर.डी यंग फेलोचे निखिल गोरे, संदीप साबळे,जयंत दुपारे,रोशन ठाकरे,अजय चंद्रवंशी,आशिष दोनाडकर,नंदू बेहरे,संदीप ढोंगे,अतुल वनस्कार,विवेक राऊत,विकास राऊत,अक्रोश शेंडे, छत्रपती ढोरे,मदन पचारे,तारकेश्वर झिलपे,विकास मोहुर्ले,सूरज झिलपे,अजय भरें,विवेक झिलपे , तगावातील विद्यार्थी, युवा वीर मराठा मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या १८ व १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फ करण्यात आले आहे. 

येत्या १८ फेब्रुवारी ला वेशभूषा स्पर्धा, धावण्याची स्पर्धा, नृत्य इतर स्पर्धा आणि 11 तारखेला घेतलेलं स्पर्धेत विजेता विद्यार्थी यांना बक्षीस देण्यात येईल  व १९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त महिलांकरीता रांगोळी स्पर्धा व भव्य मिरवणूक आयोजित करण्यात येणार असल्याचे युवा वीर मराठा मंडळाचे नितेश पाटील यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!