Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरअन् त्याने चक्क पोलीस कर्मचाऱ्याचीच दुचाकी केली चोरी…

अन् त्याने चक्क पोलीस कर्मचाऱ्याचीच दुचाकी केली चोरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- चोर कितीही चोऱ्या करणार परंतु एक ना एक दिवस त्याचा भांडाफोड होणार असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.आई-वडील दिवस रात्र काबाडकष्ट करीत मुलांना शिकवितात.मात्र काही मुले शिक्षणासहित चुकीच्या वळणावर जातात; असाच एक उच्च शिक्षित तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. दुचाकी चोरी प्रकरणात एमबीए अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला अटक करण्यात आली आहे.आशिष रहांगडाले वय २५ वर्षे रा.अष्टभुजा चंद्रपूर,असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार दुचाकी वाहन जप्त केले आहे.

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई बाबत निर्देश दिले. पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करीत तपास सुरू केला,दरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्यांची दुचाकी चोरी झाली होती.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे २५ वर्षीय तरुण विना कागदपत्रांची दुचाकी वाहन विक्री करण्यासाठी आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तरुणाला ताब्यात घेत विचारपूस केली असता सदर दुचाकी वाहन हे चोरी केले असल्याची त्याने कबुली दिली.दरम्यान आरोपी आशिष रहांगडाले २५ हा नागपुरातील एका महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे.ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलिस कर्मचारी संजय आतकुलवार, नागेश येलपुलवार आणि नितीन रायपुरे यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!