उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली) :- भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथम पंधरा वर्षात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात विकासाचा ढाचा उभा करण्यात आला; त्यावेळी दर्जेदार शैक्षणिक,आर्थिक केंद्र तसेच सिंचन सूविधा निर्माण करीत देशाच्या विकासाला दिशा देण्यात आली.मात्र या तोडीचे कार्य मागील १० वर्षात भाजपा प्रणीत केंद्र शाशनाला करता न आल्याने व त्यांचा स्वताच्याच विकास कार्यावर विश्वास नसल्याने ७० वर्षापूर्वी झालेल्या विकास पर्वावर आज संसदेत टिका करण्यात येत आहे.असा घणाघात विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी यांनी कुरखेडा येथे कांग्रेस तालूका बूथ पदाधिकारी मेळावा प्रसंगी केला आहे.
गडचिरोली जिल्हा कांग्रेस पक्षाच्या वतीने कुरखेडा येथील कीसान मंगल सभागृहात तालुका बूथ पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते.यावेळी मेळाव्याचे उदघाटक म्हणून मार्गदर्शन करताना आ.अभिजीत वंजारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महासचिव डॉ.नामदेव कीरसान,काँग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.डॉ. नामदेव उसेंडी,माजी आमदार आनंदराव गेडाम,प्रदेश सरचिटणीस डॉ.नितीन कोडवते,महीला कांग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.चंदा कोडवते,कीसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे,माजी जिल्हा अध्यक्ष हसनअली गिलानी,लता पेदापल्ली,माजी जि. प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी,सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक निताराम कूमरे,रामदास मसराम,माजी जि.प.सदस्य तथा आविसचे सरसेनापती नंदू नरोटे, तालूका यूवक कांग्रेसचे अध्यक्ष गिरीधर तितराम, महिला तालूका अध्यक्ष आशाताई तूलावी,नगरसेवीका प्राचीताई धोंडणे,नगरसेवीका कूंदा तितीरमारे नगरसेवीका हेमलता नंदेश्वर,माजी जि.प.सदस्य आशाताई कूमरे,माजी पं.स.उपसभापति श्रीराम दूगा, कपील पेंदाम,राजकुमार बावनथळे तथा मोठ्या संख्येत कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नामदेव कीरसान यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की निवडणूक ही व्यक्ति किंवा नेता जिंकत नाही तर निवडणूक जिंकण्याकरीता बूथ स्तरावरील कार्यकर्तांची फळी मजबूत असणे गरजेचे असल्याचे सांगीतले.यावेळी डॉ.नामदेव उसेंडी,माजी आ.गेडाम यांनी सूद्धा मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालूका कांग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट,संचालन जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे तर आभार प्रदर्शन माजी जि.प.सदस्य प्रभाकर तूलावी यांनी केले.

