Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांना दिल्लीचे आमंत्रण.. - महाराष्ट्रातील तब्बल १७...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांना दिल्लीचे आमंत्रण.. – महाराष्ट्रातील तब्बल १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजवंदन सोहळ्यासाठी देशभरातील विशेष कामगिरी करणाऱ्या सरपंचांना दरवर्षी निमंत्रण दिले जाते. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या,शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी ध्वजवंदनाचा भव्य सोहळा होणार आहे.या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील तब्बल १७ सरपंचांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.यात सोलापूर,नागपूर, पुणे,अकोला,ठाण,वाशिम,गडचिरोली,अहील्यानगर, गोंदिया,भंडारा,रत्नागिरी, परभणी,सातारा,अमरावती, लातूर,सांगली आणि जळगाव इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे,गडचिरोली जिल्ह्यातून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांनाही सोहळ्यासाठी दिल्लीचे आमंत्रण मिळाले असल्याने जिल्ह्यासह तालुक्यासाठी आणि गावासाठी अभिमानास्पद तितकीच गौरवाची बाब आहे.गावातील सरपंचा अपर्णा राऊत यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्यामुळे,कोंढाळा
गावाचे नाव आता थेट राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचले आहे.
अपर्णा राऊत यांनी कोंढाळा ग्रामपंचायती अंतर्गत होणाऱ्या विविध विकास कामांना प्राधान्यक्रम देत स्वछ भारत मिशन योजना,घरकुल योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ,हागणदारी मुक्त गाव,वृक्ष लागवड, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा,विधवा-निराधार महिलांच्या उदरनिर्वाहाची प्रश्र्ने,तरुणांसाठी अभ्यासिका,आरोग्य शिबिरे राबवून शेकडो नागरिकांना लाभ यासह विविध मंत्रालयांमार्फत गावाच्या विकासासाठी निधी मिळवून त्यांनी गावाला नवी दिशा दिली.गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आज कोंढाळा गाव ‘यशवंत’ ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते.त्यांच्या या कामगिरीचा गौरव आता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणार आहे.हा सोहळा केवळ स्वातंत्र्यदिनाचा उत्सव नाही,तर गावागावांत बदल घडवणाऱ्या या नेत्यांचा सन्मान आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!