Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीअखेर काटली-साखरा मार्गावरील चार मुलांना ठार करणारा ट्रक चालक व सहकारी पोलिसांच्या...

अखेर काटली-साखरा मार्गावरील चार मुलांना ठार करणारा ट्रक चालक व सहकारी पोलिसांच्या ताब्यात.. -दोघेही गोंदिया जिल्ह्यातील..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोलीहून आरमोरी मार्गे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने तब्बल सहा अल्पवयीन शाळकरी मुलांना जोरदार धडक दिल्याने यात चार मुलांचा मृत्यू झाला होता,तर दोन गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी पहाटे  पाच वाजेच्या सुमारास घडली होती.घडलेल्या अपघातात टिकू नामदेव भोयर वय १५ वर्षे,तन्वीर बालाजी मानकर वय १६ वर्षे या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.तुषार राजू मारबते वय १४ वर्षे व दूषण दुर्योधन मेश्राम वय १४ वर्षे या दोघांचा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.क्षितिज तुळशीराम मेश्राम व आदित्य धनंजय कोहपरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले होते.सर्व सहाही शाळकरी मुले ही गडचिरोली तालुक्याच्या काटली(साखरा)येथील रहिवासी होते.ते गुरुवारी पहाटेच्या सुमारास गडचिरोली-आरमोरी मार्गावरील काटली वरून साखरा मार्गे कसरत(व्यायाम) करण्याकरीता गेले होते.मार्गावरून पायी चालत जात असतांनाच गडचिरोलीहून आरमोरीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने सहाही मुलांना जोरदार धडक देऊन ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला होता.पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.घटनेने गावकऱ्यांचा रोष वाढलेला होता.त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.अश्यातच पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तपासासाठी पाच वेगवेळी पथके तयार केली होती.पोलिसांकडून ट्रकचा कसून शोध घेतला जात असतांनाच आज,शनिवार ९ ऑगस्ट रोजी ट्रकचालक व सहकारी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.सुनील श्रीराम मारगाये वय ४७ वर्षे व प्रवीण बाळकृष्ण कोल्हे वय २६ वर्षे हे दोघेही गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड येथील रहिवासी असून दोघांनाही गडचिरोली पोलीसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे.नागपूर येथील न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या पथकाकडून प्राप्त पुराव्यांच्या आधारे ट्रकचा गुन्ह्यातील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.घटनेचा पुढील तपास गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!