Friday, May 22, 2026
Homeदेसाईगंजकृषी पंपाचे ८ तासाचे भारनियमन रद्द करून १६ तास विद्युत पुरवठा सुरळीत...

कृषी पंपाचे ८ तासाचे भारनियमन रद्द करून १६ तास विद्युत पुरवठा सुरळीत करा– ओबीसी काँग्रेस कमिटी गडचिरोली तथा तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंजच्या वतीने निवेदाद्वारे मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- जिल्ह्यातीलशेतकरी बांधवांच्या कृषी पंपाच्या विद्युत पुरवठयाचे ८ तासाचे भारनियमन रद्द करून १६ तास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासंबंधाने आज ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा ओबीसी काँग्रेस कमेटी तथा काँग्रेस कमिटी देसाईगंजच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता देसाईगंज यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांस निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले की, गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम,अतिसंवेदनशील व आदिवासी जिल्हा असुन जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नाहीत.जिल्ह्यातील नागरिकांच्या उपजीविकेचे साधन केवळ धानपीक असून जिल्ह्यातील ९०% नागरिक धान पिकवरच अवलंबून आहेत.मागील तीन वर्षापासून शेतकरी बांधव सततच्या नापिकीला सामोरे जाऊन शेतकरी बांधवांनी यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरवश्यावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पीकाची लागवड केली असून यासाठी किमान १६ तास विद्युत पुरवठ्याची आवश्यकता आहे.मात्र महावितरण कंपनीने केवळ ८ तास विद्युत पुरवठा व ८ तास भारनीयमन घोषित केल्याने शेतकरी बांधवांचे धानपिक नष्ट होण्याची  शक्यता बळावली असल्याने कृषी पंपांना सुरळीत १६ तास वीज पुरवठा करण्याची तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार असतांना  मागणी करण्यात आली होती.

कृषी पंपाना ८ तास वीज पुरवठ्याचा निर्णय अतिशय गंभीर व शेतकऱ्यांना पुरते उध्वस्त करणारा असल्याने घेण्यात आलेला निर्णय तत्काळ रद्द करून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाना किमान १६ तास सुरळीत विज पुरवठा करण्यात यावा; अन्यथा महावितरण कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे दीलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन सादर करतेवेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु नरोटे,ओबीसी काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज ढोरे,ज्येष्ठ नेते परसराम टिकले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,उपाध्यक्ष नितीन राऊत,देसाईगंज युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे,मनोहर निमजे,बालाजी ठाकरे,सुरेश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,विलास बन्सोड,मंगेश गणविर,टिकाराम सहारे,शामराव पारधी,सोमेश्वर दिवठे,यादव पारधी,सचिन ठाकरे व काँग्रस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!