- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-महाप्रसाद तयार करण्यासाठी ४० लिटर क्षमतेच्या प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला. महाप्रसाद तयार झाल्यानंतर कुकर उघडतांना अचानकपणे धडाम असा जोरदार स्फोट होऊन जवळच असलेल्या नागरिकांवर कुकरमधील गरम महाप्रसाद शरीरावर उडाले.यात १४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा शहरातील बाबा मस्तान शहा वार्डात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.जखमींना तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारानंतर सात जणांना सुटी देण्यात आली.तर इतर सात जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान,खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी रुग्णालय गाठून जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.स्फोटात विक्की गणवीर,साधना गणवीर,गीता अंबुलकर,ज्योती नन्हे,माया मारवाडे, चित मारवाडे,सविता साठवणे,परवेज शेख, आशिष गणवीर,भावेश खंगार आणि रितेश साठवणे असे १४ जण जखमी झाले होते.यातील सहा जण गंभीर जखमी असून एकजण किरकोळ जखमी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत.शनिवारी बाल उत्सव शारदा मंडळाच्या वतीने महाप्रसाद बनविण्याचे काम सुरू होते.महाप्रसाद शिजल्यानंतर मंडळातील कार्यकर्त्यांनी प्रेशर कुकरचे झाकण उघण्याचा प्रयत्न केला असता मोठा स्फोट झाला होता.प्रत्यक्षदर्शिंच्या मते,आवाज इतका मोठा होता की,शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत काय झाले? म्हणून घटनास्थळी गोळा होत सर्वप्रथम जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले.
- Advertisement -

