Saturday, June 13, 2026
Homeचंद्रपूरकाँग्रेसने चिखलफेक आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारचा केला निषेध

काँग्रेसने चिखलफेक आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारचा केला निषेध

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या अनेक अन्यायकारक निर्णयाविरोधात आज दि.२१ जून रोजी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखल फेक आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर,आ. अभिजित वंजारी,आ.सुभाष धोटे व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत.मात्र,सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. नीट सारखे परीक्षा घोटाळे होत आहेत.शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसून शिंदे सरकार सगळ्या आघाड्यांवर सपशेल फेल ठरले आहे; असा आरोप यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी केला.यावेळी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक तयार करण्यात आलेल्या पुतळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर,आमदार सुभाष धोटे,आमदार अभिजित वंजारी यांनी चिखल माखून केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!