Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरओल्या पार्टीची रंगत रंगताच कार्यकर्ते लागले डोलायला.. - दोघे नशेत पडले विहीरीत;...

ओल्या पार्टीची रंगत रंगताच कार्यकर्ते लागले डोलायला.. – दोघे नशेत पडले विहीरीत; एकजण बचावला तर ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-भारतीय काँग्रेस पार्टीच्या खासदारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पी.एच.एम. मेटलचे मालक प्रमोद मगरे यांच्या फत्तापूर येथील गिट्टी खदानीवर पाचशे ते सहाशे पदाधिकारी, नागरिकांसाठी ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी विहिरीत पडून एका ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी १० नोव्हेंबरच्या रात्री फत्तापूर येथील गीट्टी खदानीत घडली.बालाजी उर्फ गजानन काळे रा.झालापांझुर्णी, ता.वरोरा असे मृतकाचे नाव आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाचे पदाधिकारी खंदे समर्थक,मतदारांना लुभावण्यासाठी फार्म हाऊस,गुप्त ठिकाणावर ओल्या पार्टीचे मटणाचे आयोजन करतात.खासदर प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे हे काँग्रेसकडून आमदारकीसाठी उभे आहेत.४ नोव्हेंबरपासून वरोरा-भद्रावती विधानसभेतील उमेदवार प्रचार करण्यासाठी सक्रिय झाले आहेत.या निवडणुकीत उमेदवार निवडून यावा याकरिता उमेदवाराचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रमोद मगरे यांनी रविवारी फत्तापूर येथील खदानीमध्ये मतदार कार्यकर्त्यांसाठी ओल्या पार्टीचे आयोजन केले होते.या पार्टीमध्ये असंख्य नागरिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.ओल्या पार्टीची रंगत रंगताच कार्यकतें डोलायला लागले.या पार्टीत सहभाग घेतलेले पांझुर्णी येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन काळे महल्ले, अरुण महल्ले यांना मद्याच्या धुंदीत हिरव्या मॅटवर दारूचा ग्लास घेऊन बसायला गेले.नशेत त्यांना या मॅटखाली असलेल्या विहिरीचा अंदाज लागला नाही आणि विहीत पडले.मात्र,अरुण मह ल्ले यांना पोहता येत असल्याने त्यांनी आपला जीव कसातरी वाचविला तर गजानन काळे हे विहिरीतील गाळात फसल्याने त्यातच त्यांचा अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले,पाण्याचा अंदाज लागत नसल्याने पोलिसांनी रेस्क्यू टीमला सकाळी बोलविले.अथक परिश्रमानंतर रेस्क्यू टीमने काल,सोमवारी सकाळी १०:३० वाजता मृतदेह बाहेर काढला.पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केला.पोलिसांनी मर्ग दाखल करुन गुन्हा नोंदविला.घटनेचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!