Friday, July 31, 2026
Homeदेसाईगंजउद्यापासून देसाईगंज तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन.. - कोंढाळा-मेंढा वैनगंगा नदी घाटातून...

उद्यापासून देसाईगंज तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन.. – कोंढाळा-मेंढा वैनगंगा नदी घाटातून कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा-मेंढा वैनगंगा नदी घाटातून कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा करण्यात आला असून कोंढाळा गावातील सुजाण नागरिक तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी वेळोवेळी देसाईगंज महसूल विभागास अवैध वाळू उपसा प्रकरणी अवगत करून पत्रानिशी कळविले. मात्र,झोपेचे सोंग घेणारे प्रशासन ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने अखेर देसाईगंज महसूल प्रशासनासह जिल्हा प्रशासनास खळबळून जागे करण्याकरीता उद्या,सोमवार दिनांक-३० डिसेंबर पासून देसाईगंज तहसील कार्यालयासमोर कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी विविध मागण्या घेऊन नामदेव वसाके यांचेसह सत्यवान रामटेके बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.
दिलेल्या पत्रकात म्हटले की,देसाईगंज तालुक्याच्या मौजा-कोंढाळा येथील मेंढा वैनगंगा नदी रेतीघाटाची कुठल्याही प्रकारची लिलाव प्रक्रिया न होता देसाईगंज महसूल विभागाचे मंडळ अधिकारी के.पी.ठाकरे आणि कोंढाळा साजाचे तलाठी अर्चना टीचकुले यांनी कुठल्याही प्रकारे अवैध वाळू उपसा प्रकरणी आळा घातला नसल्याने जवळपास २ किलोमिटर वर्तुळाकार अंतर जमिनीपासून ५ फुटाच्यावर हजारो ब्रास वाळूचे अवैधरित्या उत्खनन करण्यात आले व शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक संबंधात दिनांक-२८ डिसेंबर २०२४ च्या रात्री ९.०७ वाजेच्या सुमारास वाळू भरलेला पकडलेला टीप्पर क्रमांक-एम एच ४० सीटी ९८९१(MH 40CT 9891) यावर सुरुवातीला पंचनामा करून जप्तीची कार्यवाही करण्यात आली; मात्र,सदर वाळू भरलेल्या टीप्परवर खरोखरच कारवाई करून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक संबंधात रकमेचा भरणा करण्यात आला काय? तसेच अवैध वाळू उपशावर तात्काळ आळा घालण्यात येणार काय?अश्या विविध मागण्या घेऊन उद्याला बेमुदत ठिय्या आंदोलन देसाईगंज तहसील कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याने आता तरी प्रशासन खळबळून जागे होणार काय? याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!