Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूरवाघोबाची झलक पहायची असेल तर किमान दोन महिने पाहावी लागणार वाट..

वाघोबाची झलक पहायची असेल तर किमान दोन महिने पाहावी लागणार वाट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघोबाची एक झलक पाहण्यासाठी देशभरातील वन्यप्रेमींसह विदेशी पर्यटकही आतूर असतात.मात्र,तुम्ही जर ताडोबातील वाघाचे दर्शन घेण्याचा बेत आखत असाल तर तुम्हाला किमान दोन महिने वाट पाहावी लागेल.कारण,फेब्रुवारीपर्यंतचे जंगल सफारीचे बुकिंग फुल्ल झाले आहे.मार्चमध्येच तुमचे ‘वेटिंग’ संपणार असून,त्यानंतर व्याघ्रदर्शनाचा मुहूर्त असणार आहे.
ताडोबाची जंगल सफारी केली की हमखास वाघ पाहायला मिळतोच.यामुळेच वन्यजीव प्रेमींसह पर्यटकांचा ओढा ताडोब्याकडे वाढला आहे.ताडोबा परिसरात राहण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देणारे रिसॉर्ट या सोयींमुळे पर्यटकांची सर्वकाळ ताडोब्याला पसंती असते.सध्याच्या स्थितीत तर ताडोबासाठी जंगल सफारीचे बुकिंग मिळणे कठीण झाले आहे.येथील मोहर्ली,नवेगाव,कोलारा व पांगडी-झरी हे सर्व गेट (कोअर झोन) फेब्रुवारीपर्यंत हाऊसफुल्ल आहेत.मोहर्ली गेटवर मार्चनंतरही फक्त १० ते १५ टक्केच बुकिंग आहेत.नवेगाव गेटवर तर त्यापेक्षाही कमी फेऱ्या शिल्लक आहेत.त्यामुळे वेट अँड वाचची भूमिका असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी...

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!