Saturday, September 12, 2026
Homeचंद्रपूरआरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू...

आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील आरोग्य
उपकेंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकेचा
चांदापूर फाट्यावर अपघाती मृत्यू झाला.मंदाताई तिरुपती कलपल्लीवार वय ४० वर्षे असे मृत्यू झालेल्या आरोग्य सेविकेचे नाव आहे.
सदरची घटना काल,बुधवारी १३ नोव्हेंबरच्या दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.मंदाताई कलपल्लीवार या मूल येथील रहिवासी असून त्या तालुक्यातील जुनासुर्ला येथील उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत होत्या.काल बुधवारी दुपारच्या सुमारास जुनासुर्ला येथून आपले कर्तव्य बजावून एमएच ३४ एक्स ९३७० या क्रमांकाच्या दुचाकीने त्या मूलकडे जात होत्या. दरम्यान,मूल कडून गोंडपिपरीकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक एमच एच ४० सीटी ५३२१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये आल्याने त्यांचा अपघात झाला.मूल पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!