Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीआरमोरी विधानसभा क्षेत्रातील अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश.. ...

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश.. – आमदार रामदास मसरामांकडून दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रास तीन दिवसांपासून दररोज सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धान आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अशातच अनेक ठिकाणी उभी पिके आडवी झालीत तर काही ठिकाणी संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होऊन आर्थिक विवंचनेत सापडला आहे.सदरची बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या लक्षात येताच जिल्हा प्रशासनासह महसूल विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.त्याचप्रमाणे पंचनामे करतांना पारदर्शकता व गती राखण्याचेही निर्देश दिले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळू शकेल.
ऐन पिके गर्भात असतांनाच अवकाळीने झोडपले आहे.अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके हातची गेली आहेत.विशेषतः कर्ज घेऊन पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.या पावसामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे.या संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार मसराम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.त्यांनी धीर सोडू नये.आम्ही शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून योग्य त्या नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करत आहोत.पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण होऊन अहवाल शासनाला सादर केला जाईल.” गडचिरोलीसह विदर्भातील अनेक भागांमध्ये दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची मागणीही आमदार मसराम यांचेकडून होत आहे. त्यातच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिक विमा, जलसंधारण आणि शेतीसंबंधीच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!