Saturday, April 18, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज झाडीपट्टीचे नाट्य कलावंत मुस्ताक शेख यांचा सत्कार..

देसाईगंज झाडीपट्टीचे नाट्य कलावंत मुस्ताक शेख यांचा सत्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरात वास्तव्यास असणारे तसेच अनेक पौराणिक व ऐतिहासिक नाटकात काम करून रसिक जणांच्या दिलावर राज करणारे झाडीपट्टीचे नाट्य कलावंत मुस्ताक जमील शेख यांचा नुकताच नागपूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील झाडीपट्टी नाट्य रंगभूमीची नाटके सर्वत्र मोठ्या प्रमाणावर गाजू लागली आहेत.झाडीपट्टी रंगभूमीच्या
माध्यमातून समाजप्रबोधन,वास्तविकता,सत्यता, मनोरंजन तथा इतर पौराणिक व ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण कलावंत करीत असतात.त्यातच देसाईगंज रंगभूमीचे गाजलेले नाटक ‘भाकर’ याचे ७०० च्या वर नाट्य प्रयोगाचे सादरीकरण कलावंतांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सदरच्या नाटकात तसेच अनेक पौराणिक व ऐतिहासिक नाटकात मुस्ताक जमाल शेख यांनी उत्कृष्ट कलेचे सादरीकरण करून रसिक जणांची मने जिंकून  झाडीपट्टी रंगभूमीवरील सेवेबद्दल कलावंत म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नागपूर येथे पार पडलेल्या विभागीय नाट्य संमेलनात नाटक,मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध कलावंतांची तसेच मान्यवर मंडळींची व रसिकांची उपस्थिती होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!