Saturday, September 5, 2026
Homeआरमोरीआमदार मसराम यांचे रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश.....

आमदार मसराम यांचे रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश.. – आरमोरी तहसील कार्यालयात बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार ९ फेब्रुवारीला रेल्वे प्रकल्पाशी संबंधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आरमोरी तहसील कार्यालयात सविस्तर बैठक घेण्यात आली.रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा योग्य तो वाढीव मोबदला मिळावा तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे,ही प्रमुख मागणी या बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आली.प्रसंगी बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी मोबदला निश्चिती,जमिनीचे मोजमाप,कागदपत्रांची पूर्तता तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब यासंदर्भातील अडचणी सविस्तरपणे मांडल्या.यावेळी आमदार मसराम यांनी विकास प्रकल्प राबवितांना शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च असले पाहिजे,कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही,याची दक्षता घेत योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन बाधित शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.यावर देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रधान यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.तसेच आरमोरी तहसील कार्यालयाच्या तहसीलदार चौधरी यांनी प्रशासनामार्फत आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही दिली.या बैठकीस महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी तसेच रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसंगी आरमोरी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,धनपाल मिसार,जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दिलीप घोडाम, कवडू शहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!