Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरआजीचे कानतोड्या नातवाला २ वर्षे कारावास - आजीच्या कानात होती; सोन्याची बिरी...

आजीचे कानतोड्या नातवाला २ वर्षे कारावास – आजीच्या कानात होती; सोन्याची बिरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नातवाने चक्क आजीचा कानच तोडल्याची घटना दोन वर्षभरापूर्वी गोंडपिपरी तालुक्यातील राळेगावात घडली होती.याप्रकरणी गोंडपिपरी तालुका न्यायालयाने बुधवारी निकाल देत नातवाला दोन वर्षांची शिक्षा व पाच हजारांचा दंड ठोठावला.राहुल देठे असे आरोपी नातवाचे नाव आहे.राहुलला दारूचे व्यसन आहे.आधीच दारू पिऊन असताना पुन्हा त्याला दारू पिण्याची तलब आली.पण खिशात पैसे नव्हते.अशावेळी तो आपली आजी बुधाबाई रायपुरे ८० यांच्या घरी गेला.दारूसाठी पैशांची मागणी केली, पण पैसे देण्यास आजीने नकार दिला.त्याला आजीच्या कानात सोन्याची बिरी दिसली. त्याने जबरदस्तीने आजीच्या कानातील सोन्याची बिरी खेचून पळ काढला.या घटनेत आजीचा कानच तुटला व गंभीर जखमी झाली. याप्रकरणी आजीने गोंडपिपरी पोलिस ठाण्यात तक्रार केली.पोलिसांनी कलम ३२७ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला.ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वसंत कोसनशिले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.न्यायाधीशांनी पुरावे तपासून आरोपी राहुलला दोन वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.सरकारी वकील म्हणून ॲड.राजेश धात्रक यांनी कामकाज सांभाळले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!