Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीखास शिवजयंती निमित्ताने.....गडचिरोली येथे 'धर्मरावबाबा आत्राम अकॅडमी' ची स्थापना..- जिल्ह्यात प्रथमच मोफत...

खास शिवजयंती निमित्ताने…..गडचिरोली येथे ‘धर्मरावबाबा आत्राम अकॅडमी’ ची स्थापना..- जिल्ह्यात प्रथमच मोफत पोलीस,आर्मी भरती प्रशिक्षण व क्लासेसचे आयोजन 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पोलीस भरती,आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या मुला-मुलीं करीता पहिल्यांदाच आज १९ फेब्रुवारी २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथे ‘धर्मरावबाबा आत्राम अकॅडमी’ ची स्थापना केली जात आहे.

‘धर्मरावबाबा आत्राम अकॅडमी’ च्या माध्यमातुन जिल्ह्यातील गोरगरीब,होतकरू मुले-मुली पोलीस भरती,आर्मी भरती प्रशिक्षण व क्लासेस पासून वंचित राहू नये; याकरिता तरुण पिढी करीता पहिल्यांदाच असा संपूर्ण उपक्रम मोफत राबविला जात असल्याने जिल्ह्यातील मुला-मुलींनी मोफत पोलीस भरती,आर्मी भरती प्रशिक्षण व क्लासेसचा लाभ घ्यावा; असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांनी केले आहे.

देण्यात येणारे प्रशिक्षण व क्लासेस👇

मराठी व्याकरण,गणित,बुद्धिमत्ता चाचणी,सामान्य ज्ञान,जिल्ह्याची माहिती,गोंडी भाषा

शारीरिक चाचणीसाठी उपलब्ध मैदान👇

1600 मीटरचे मैदान

100 मीटरचे मैदान

गोळा फेक

देण्यात येणाऱ्या सेवा 👇

अनुभवी शिक्षक वर्ग,सेवानेतृत्व सेना अधिकारी,खेळाडू प्रशिक्षक यांच्याकडून प्रशिक्षण 

सिसी टिव्ही कॅमेरा,प्रोजेक्टर वर शिकवणी व प्रशिक्षणाची सर्व आधुनिक साहित्य

धर्मरावबाबा आत्राम अकॅडमी,गडचिरोली येथे जिल्ह्यातील मुला-मुलींकरीता संपुर्ण मोफत पोलीस,आर्मी भरती प्रशिक्षण व क्लासेससाठी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक – 8605986779( तनुश्रीताई आत्रम)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!