Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरआज रात्री दिसणार रक्तासारखा लाल चंद्र; अंधश्रद्धा न बाळगण्याचे आवाहन..

आज रात्री दिसणार रक्तासारखा लाल चंद्र; अंधश्रद्धा न बाळगण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आज चंद्राला ग्रहण लागणार असून भारतात सर्वत्र खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे.आज,रविवार ७ सप्टेंबर रोजी छायाकल्प चंद्रग्रहणाची सुरुवात रात्री ९ वाजता होईल.खंडग्रास ग्रहणाची सुरुवात ९ वाजून ५७ मिनिटांनी तर खग्रास ग्रहण रात्री ११ वाजता सुरू होईल आणि ते रात्री १२ वाजू २२ मिनिटांपर्यंत दिसेल.या दरम्यान चंद्र हा रक्तासारखा लाल रंगाचा दिसणार आहे. रक्तासारख्या दिसणाऱ्या चंद्राला खगोलीय भाषेत ‘ब्लड मून’ किंवा ‘रेड मून’ असे म्हटले जाते.खग्रास स्थिती ही २ तास ७ मिनिटांची असेल.आकाशात ढगाळ वातावरण नसेल,तर सुंदर असे ग्रहण पाहता येईल.याबाबत कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता ग्रहणाचा खगोलीय आणि वैज्ञानिक दृष्टीने निरीक्षण करावा,असे आवाहन खगोल अभ्यासक तथा स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!