- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-झाडीपट्टी रंगभूमी ही मराठी रंगभूमीचा ध्यास असून मराठी नाट्यगीतामुळेच शास्त्रीय संगीताची निर्मिती झाली,असे मौल्यवान उदगार प्रा.डॉ.शेखर डोंगरे यांनी नाट्यगीत गायन स्पर्धेच्या प्रसंगी काढले.नुकतेच गडचिरोली झाडीपट्टी कलावंत संस्था गडचिरोलीच्या वतीने कमल केशव सभागृह येथे विदर्भ स्तरीय नाट्य गीत गायन स्पर्धा आयोजित कारण्यात आली होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीपट्टीचे जेष्ठ रंगकर्मी विनोदी कलावंत प्रा.शेखर डोंगरे हे होते.तर उदघाटक म्हणून प्रा.राजेश कात्रटवार नगरसेवक गडचिरोली, बाशीद शेख सामाजिक कार्यकर्ता,संगीतकार प्रल्हाद मेश्राम देसाईगंज,सुनील पेंदोरकर वनपाल,अरविंद गेडाम नागरी बँक,जेष्ठ रंगकर्मी दादा चुधरी,सुनील चडगूलवार, साहित्यिक तथा नाटककार चुडाराम बल्लारपूरे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम नटेश्वराचे पूजन करून उदघाटन कारण्यात आले.कार्यक्रमामध्ये चडगुलवार, बाशीद शेख यांची भाषणे झाली.तर उदघाटक म्हणून बोलतांना प्रा.राजेश कात्रटवार यांनी मागील वर्षांपासून कलावंत संस्थेनी चालू केलेला उपक्रम स्तुत्य असून नवरात्रीमधे एखादा कार्यक्रम करावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तर अध्यक्ष पदावरून बोलतांना प्रा.डॉ.शेखर डोंगरे यांनी शास्त्रीय संगीताची गायकी असलेल्या गायकांना त्यांच्या हक्काचा स्टेज मिळवून त्यांच्यातील सुप्तगुण लोकांपर्यंत पोहचविण्याचा या मंडळाचा उद्देश चांगला असून झाडीपट्टी मधील नाट्य कलावंत दिसून येत नाही ही न्यूनता आहे.नाट्यगीत हळूहळू लोप पावत असल्याचे दिसून येते.त्यामुळे अश्या प्रकारचे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे.नाट्यगीतामुळेच शास्त्रीय संगीताला प्रसिद्धी मिळाली,हे विशेष.या स्पर्धेत भाग घेणारे बाल कलावंत पुढे जाऊन निश्चितच प्रगती करतील हा विश्वास मला वाटतो,असे मौलिक विचार त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमामधे जेष्ठ नाटककार म्हणून सिद्धार्थ गोवर्धन,जेष्ठ कलावंत म्हणून वासुकुमार, राजेंद्र जरुडकर आणि महिला जेष्ठ कलावंत म्हणून उषा किरण यांचा मान्यवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रल्हाद मेश्राम संगीतकार,वैशाली मडावी संगीत शिक्षक,तुलाराम राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली.या स्पर्धत सात वर्षांपासून ते ७१ वर्षां पर्यंतच्या एकूण २९ स्पर्धकांनी भाग घेतला.स्पर्धेनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला.बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल धामोळे जिल्हा प्रतिनिधी दैनिक देशोन्नती तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती मारोतराव इचोडकर,प्रा.चापले,प्रवीण मुक्तावरम गुरुदेव भक्त,बानबले व पुढके होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल धामोळे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की,या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कलावंत संस्थेचे मी मनापासून कौतुक करतो.नाट्यगीत स्पर्धेमुळे स्त्रीयांना व मुलांना गायनात प्राधान्य मिळतो.या संस्थेमार्फत त्यांनी समाज प्रबोधनपर जनजागृतीचे कार्यक्रम करत रहावे.त्यासाठी माझे सहकार्य नेहमीच आपल्या सोबत राहील.मनस्वीनी तर्फे देशोन्नती परिवार बहुजन वर्गातील स्त्रियांना सांस्कृतिक कार्यक्रमामधून पुढे आणण्याचे कार्य करीत आहे.त्यानंतर उपस्थित
मान्यवारांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.यामध्ये प्रथम पारितोषिक संतोष प्रधान आरमोरी, द्वितीय पारितोषिक राजू ठाकूर चिखली,तृतीय पारितोषिक आसावली ठोंबरे गडचिरोली,चतुर्थ पारितोषिक असीम कृपाकर गडचिरोली तर प्रोत्साहन पर तीन बक्षीस वनश्री मेश्राम ब्रम्हपुरी जिशान शेख, हिरल सोनटक्के गडचिरोली यांना मिळाले.सहभागी सर्व स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात आले.नाट्य गीत,नाट्य संगीत व स्पर्धेच्या नियमांची सविस्तर माहिती देऊन संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंडळाचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ गोवर्धन व वर्षा गुरनुले यांनी तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र उपाध्याय,दिलीप मेश्राम व आभार प्रदर्शन सचिव राज बोभाटे,विवेक मुन यांनी केले.कार्यक्रमा करिता कोषाध्यक्ष मारोती लाकडे,भगवान गेडाम,सदाभाऊ उईके,प्रकाश लाडे,अशोक सूत्रपवार, नवीन शेंडे,रुमाजी भुरले,प्रकाश मेश्राम,शाहीर तुळशीराम उंदीरवाडे,वसंत चापले,विवेक मुन,अमित पिपरे,हेमंत कावळे,राज मराठे,संदीप कुरवटकर,निरंजन भरडकर, ओमप्रकाश संग्रामे,वीरेंद्र सोनावणे,गुरुदेव नैताम,अनिल कडुकर, आयशा अली,उषा मुळे,प्रा.गहाणे,टिकाराम सालोटकर,सविता भोयर यांनी अथक परिश्रम घेतले.
- Advertisement -

