Saturday, June 20, 2026
Homeचंद्रपूरअल्पवयीन मुलीने बाळाला दिला जन्म; आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..

अल्पवयीन मुलीने बाळाला दिला जन्म; आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-दिवसेंदिवस लैंगिक शोषणाच्या प्रमाणात वाढ होत असतांना पोंभुर्णा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीने बाळास जन्म दिला असल्याने लैंगिक शोषणाचा हा प्रकार मंगळवारी २१ जानेवारीला उघडीस आला.त्यानंतर आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे.भगवानदास शंकर पस्तमवार वय २० वर्षे,रा.उमरी पोतदार,ता.पोंभुर्णा असे अरोपीचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही गर्भवती होती.ती भटक्या समाजातील अशिक्षित मुलगी असल्यामुळे या गोष्टीकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.मात्र,दोन दिवसाआधी ती गर्भवती असून; बाळाला जन्म देण्यासाठी रूग्णालयात दाखल केले असता.संबंधीत प्रकार उघडीस आला.अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला असून; तिला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ती मुलगी अल्पवयीन असल्याने पोतदार पोलिस चौकी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीला या मुलाचा पिता कोण? याबाबत विचारणा केली असता पीडितेने सांगीतले की,आरोपी शंकर पस्तमवार याच्यासोबत मागील एक वर्षापासून तीचे प्रेमप्रकरण सुरू होते.त्याच प्रेमप्रकरणात ती गर्भवती राहीलेली आहे.पीडितेच्या तक्रारीनुसार पोतदार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आरोपीला ताब्यात घेतले व काल बुधवारी अरोपीला न्यायालयात हजर केले असता,चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने आरोपीचे डीएनए सँपल गोळा करण्याकरिता आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.अरोपीच्या बाजूने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत मुख्य लोक अभिरक्षक ॲड. विनोद बोरसे यांनी मोफत विधी सेवा पुरविली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!