- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एस टी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे.भाडेवाढीवर शिक्कामोर्तब होताच आज,गुरुवारी रात्रीपासून म्हणजेच शुक्रवार २४ जानेवारी पासून एस.टी.ची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.भाडेवाढ झाल्यानंतर एस टी चा प्रवास ६० ते ८० रुपयांनी महागणार आहे.
एस.टी.महामंडळ राज्यभरात दररोज सुमारे १४ हजार बसेसच्या माध्यमातून ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करते.त्यातून महामंडळाला दिवसाला अंदाजे २३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.तथापि,महामंडळाचे महिन्याला मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचे गणित काही बसत नाही.त्यामुळे महामंडळाला दिवसाला सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. यास्तव महामंडळाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला.महामंडळाने राज्य सरकारला १४.१३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे.यापूर्वी २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी महामंडळाची १७.१७ टक्के भाडेवाढ झाली होती.
- Advertisement -

