Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरअल्पवयीन प्रेयसीचे बनावट आधार कार्ड तयार करून केले लग्न.. - तरुणाविरुद्ध गुन्हा...

अल्पवयीन प्रेयसीचे बनावट आधार कार्ड तयार करून केले लग्न.. – तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका अल्पवयीन मुलीचे वय लग्नाचे होण्याच्या आधीच तरुणाने बनावट आधार कार्ड तयार करून त्यात तीन वर्षांपूर्वीची जन्माची नोंद घेतली आणि एका मंदिरात लग्न केले.प्रकरणाचा भांडाफोड होताच तरुणाविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरचा प्रकार काल शनिवारी वरोरा तालुक्यात उघडकीस आला.अक्षय राजू मडावी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
कायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे किमान वय १८ वर्षे  पूर्ण असणे आवश्यक आहे.मात्र,काहीजण अती उताविळपणा करून ‘चट मंगणी पट ब्याह’ करू पाहतात.त्यातच,प्रेम प्रकरण सुरू असतांनाच
अनेक तरुण मुलीचे अठरा वर्ष कधी होतात,अशी आतुरतेने वाट बघत असतात.पण,सदरच्या प्रकरणात
मुलीचे वय कायद्याने लग्नासाठी कमी असल्याने अक्षयने अल्पवयीन प्रेयसीचे बनावट आधार कार्ड तयार करून मुलीचा जन्म २००८ सालचा असतांना, बनावट आधार कार्डमध्ये जन्म वर्ष २००५ दाखवून मुलीचे वय लग्नाचे झाल्याचे दाखविले.त्यानंतर,वणी-वरोरा बायपास मार्गालगत असलेल्या एका मंदिरात दोघांनी लग्न केले. प्रसंगी लग्नात अनेकजण उपस्थित असल्याची माहिती पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी वरोरा पोलिसात रात्री सव्वा दहा वाजता अक्षय मडावी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!