Thursday, October 15, 2026
Homeचंद्रपूरअन् धावत्या बसने क्षणांतच घेतला पेट; जीवितहानी टळली..

अन् धावत्या बसने क्षणांतच घेतला पेट; जीवितहानी टळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-तब्बल ४० पेक्षा अधिकचे प्रवासी घेऊन गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे निघालेल्या एका इलेक्ट्रिक बसला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना आज,शुक्रवार ८ मे रोजी दुपारच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील घंटाचौकीजवळ घडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.सुदैवाने जीवितहानी टळली.मात्र, उन्हाच्या तीव्र झळांमुळे बसने काही क्षणांतच पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण बस आगीत भस्मसात झाली.एमएच ४९ बीझेड ४१८७ क्रमांकाची इलेक्ट्रिक बस चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल बसस्थानकावरून प्रवाशांना घेऊन पुढे रवाना झाली होती.बस भरधाव वेगात असतांना बसमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना बाहेर निघण्यास सांगितले.दरम्यान,बसने काही क्षणांतच पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे  अधिकारी,पोलिस प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला,मात्र तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!