- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील धोप गावाजवळ काल रविवारच्या सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.यश लोखचंद पुसाम वय २१ वर्षे,रा. गोबरवाही,ता.तुमसर,जि.भंडारा व संदीप मनोहर वरकडे वय २६ वर्षे,रा.फुटाळा-कान्द्री,ता.मोहाडी,जि.भंडारा अशी मृतक तरुणांची नावे आहेत.
यश व संदीप हे दोघेही सायंकाळच्या सुमारास एमएच ३६ एपी ४७३२ क्रमांकाच्या दुचाकीने फुटाळा येथून तुमसरकडे एका नातेवाईकाला घेण्यासाठी निघाले होते. दरम्यान,धोप गावाजवळ पोहचताच एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक बसताच दोघेही सिमेंट मार्गावर धाडकन कोसळले.यात दोघांचाही काही वेळातच मृत्यू झाला.अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
- Advertisement -

