- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांना मिळताच त्यांनी एका अवैध रेतीने भरलेल्या टिप्परचा पाठलाग करतांना तिसऱ्याच व्यक्तीने बोलेरो वाहन मधोमध आणून कारवाईत अडथळा आणल्याने वळण मार्गावरील शेतात उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाहन उलटून अपघात घडल्याची घटना गुरुवार ९ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांदोरी ते पचखेडीअंतर्गत मार्गावर चांदोरी गावाजवळील स्मशानभूमी रस्त्यावर घडली होती.यात उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे आणि त्यांचे पती शाहबाज शेख जखमी झाल्याने गुरुवारी सायंकाळी माधुरी तिखे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी मिळाली,तर त्यांचे पती शाहबाज शेख यांना दुपारनंतरच सुटी झाली होती.प्रकरणी एमएच ३६ एएल २८५३ क्रमांकाच्या बोलेरो वाहन व एमएच ३६ एए ४१०६ क्रमांकाच्या टिप्पर वाहन चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०९,१३२,३(५),३०३(२),जमीन महसूल कायद्याच्या उपकलम ४८ आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या उपकलम ७ आणि ९ अंतर्गत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. अपघातानंतर समोरील ट्रक आणि मागील बोलेरो ही दोन्ही वाहने फरार झाली होती.तक्रार प्राप्त होताच एपिआय प्रशांत साखरे सह पोलीस पथकाने रात्रीच्या सुमारास टीप्पर चालकास खात गावातून अटक केली आहे.दीपक भुरे असे चालकाचे नाव असून संबंधित वाहनही जप्त करण्यात आले आहे.चालकाला काल शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १२ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.मात्र,बोलेरो वाहन चालक अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसल्याने सदरचे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
- Advertisement -

