Saturday, June 13, 2026
Homeचंद्रपूरअखेर चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील ला झाली अटक-एक लाखाची...

अखेर चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील ला झाली अटक-एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी होता फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- नवीन बिअर शॉपीला परवाना देण्यासाठी एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी फरार आरोपी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना अखेर काल,मंगळवारी (दि.१४) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.त्यांना न्यायालयाने २ दिवसांचा पीसीआर दिला आहे.घुग्घूस येथील रहिवासी असलेल्या तकारकर्त्यांना बीअर शॉपीचा परवाना हवा होता.मंगळवारी (दि.७) दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी परवाना देण्याच्या कामासाठी लाच मागितली होती. ती अधीक्षक अभय खताळ यांच्यामार्फत स्वीकारली होती.एसीबीच्या तपासानंतर अधीक्षक पाटील यांनी लाच घेण्याचे मान्य केले होते. या प्रकरणी एसीबीने खारोडे आणि खताळ यांना यापूर्वीच अटक केली.तर अधीक्षक पाटील पसार झाले होते.

एसीबीच्या पथकाने अधिकाऱ्यांच्या घरातून लाखो रुपयांचा माल जप्त केला होता.दरम्यान,पसार अधीक्षक संजय पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला.आता हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती वकिलांच्या माध्यमातून मिळाली आहे.दरम्यान, मंगळवारी आरोपी संजय पाटील यांना एसीबीने अटक केली.न्यायालयाने त्यांना दोन दिवसांचा पीसीआर दिला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जिल्ह्यात कुठेही शासकीय अधिकारी,कर्मचारी किंवा त्यांचे माध्यम लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!