- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात मन सुन्न करणारी घटना पिडीत चिमुकलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तब्बल सहा दिवसांनी उजेडात आली.एका १८ वर्षीय नराधम आरोपीने दोन मुलींच्या उपस्थितीतच अकरा वर्षीय बालिकेवर अत्याचार केला होता.सदरची घटना ही १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. आरोपीने स्वतःच्या चारचाकी वाहनात बसवून तीन अल्पवयीन मुलींना जंगल परिसरात फिरवून आणण्याच्या बहाण्याने नेले आणि एका अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला.सदर प्रकरणाची कुटुंबीयांना कानकुन लागताच मंगळवार २४ मार्च रोजी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लाखांदूर पोलिसांनी आरोपी विरोधात ‘पॉस्को’अंतर्गत व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.प्रथम ईश्वर कुडेगावे वय १८ वर्षे,रा.पिंपळगाव/कोहळी,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे आरोपीचे नाव असून तो घटनेनंतर फरार झाला होता.घटनेनंतर आरोपी प्रथम कुडेगावे हा नागपूर येथे पसार झाला होता.नागपूर येथे कामाचा शोध घेऊ लागला.मात्र,त्याला कोणतेही काम मिळाले नसल्याने तो पुन्हा परत गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज(वडसा)येथे परतला.त्यानंतर तो आपल्या नातेवाईकांकडे चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथुल/मेंढाळा येथे वास्तव्यास होता. अश्यातच लाखांदूर पोलीस प्रशासन त्याच्या मागावर असतांनाच आरोपीचा ठावठिकाणा लागताच त्याला काल बुधवारी मिंथुल/मेंढाळा येथून अटक करण्यात आली.
- Advertisement -

