Sunday, August 30, 2026
Homeगडचिरोलीआरमोरीच्या कुरंडीमाल आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन..

आरमोरीच्या कुरंडीमाल आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत.त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आत्मविश्वास,आर्थिक साक्षरता,आरोग्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यावश्यक आहे.यामुळेच विद्यार्थी जागतिक स्पर्धात्मक युगात सक्षमपणे उभे राहू शकतात,असे प्रतिपादन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.आरमोरी तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा, कुरंडीमाल येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे.मेल-जोल संस्थेने आदिवासी विकास विभागाशी समन्वय साधून कुरंडीमालसारख्या दुर्गम भागात संगणक प्रयोगशाळा उभारणे हे अत्यंत स्तुत्य कार्य आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व कौशल्यात मोठी भर पडून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. तसेच डिजिटल दरी कमी करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अत्याधुनिक संगणक,इंटरनेट सुविधा व डिजिटल शिक्षण साधनांनी सुसज्ज असलेल्या या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध होणार असून डिजिटल युगातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास मोठी मदत होणार आहे.कार्यक्रमास सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी एम.अरुण,मेल-जोल संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंकजा,उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान, तहसीलदार उषा चौधरी तसेच शासकीय आश्रमशाळा कुरंडीमालचे मुख्याध्यापक आर.जी.तुमराम यांची प्रमुख उपस्थिती होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!