Wednesday, May 27, 2026
Homeभंडाराअकरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून फरार आरोपी अटकेत.. -घटनेनंतर आरोपी नागपूर,देसाईगंज फिरला...

अकरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून फरार आरोपी अटकेत.. -घटनेनंतर आरोपी नागपूर,देसाईगंज फिरला व शेवटी सापडला चंद्रपूर जिल्ह्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात मन सुन्न करणारी घटना पिडीत चिमुकलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तब्बल सहा दिवसांनी उजेडात आली.एका १८ वर्षीय नराधम आरोपीने दोन मुलींच्या उपस्थितीतच अकरा वर्षीय बालिकेवर अत्याचार केला होता.सदरची घटना ही १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. आरोपीने स्वतःच्या चारचाकी वाहनात बसवून तीन अल्पवयीन मुलींना जंगल परिसरात फिरवून आणण्याच्या बहाण्याने नेले आणि एका अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला.सदर प्रकरणाची कुटुंबीयांना कानकुन लागताच मंगळवार २४ मार्च रोजी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लाखांदूर पोलिसांनी आरोपी विरोधात ‘पॉस्को’अंतर्गत व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.प्रथम ईश्वर कुडेगावे वय १८ वर्षे,रा.पिंपळगाव/कोहळी,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे आरोपीचे नाव असून तो घटनेनंतर फरार झाला होता.घटनेनंतर आरोपी प्रथम कुडेगावे हा नागपूर येथे पसार झाला होता.नागपूर येथे कामाचा शोध घेऊ लागला.मात्र,त्याला कोणतेही काम मिळाले नसल्याने तो पुन्हा परत गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज(वडसा)येथे परतला.त्यानंतर तो आपल्या नातेवाईकांकडे चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथुल/मेंढाळा येथे वास्तव्यास होता. अश्यातच लाखांदूर पोलीस प्रशासन त्याच्या मागावर असतांनाच आरोपीचा ठावठिकाणा लागताच त्याला काल बुधवारी मिंथुल/मेंढाळा येथून अटक करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!