Friday, September 11, 2026
Homeनागपूरअचानक छातीत कळ आली आणि पायरीवरच कोसळले; वकीलाचा दुर्दैवी मृत्यू..

अचानक छातीत कळ आली आणि पायरीवरच कोसळले; वकीलाचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-जीवनाचे काही खरं नाही.त्यामुळे माझा- माझा म्हणून मोठा गाजावाजा करू नका,जीवन हे नश्वर आहे; त्यावर कुणाचाही ताबा नाही,कधी काय होणार हे सांगताच येत नाही; अशी संतांची शिकवण होती आणि ती पत्यक्ष नजरेसमोर घडतांना दिसून येत आहे.अश्याच प्रकारे नेहमीप्रमाणे सकाळी उठून फिरायला जाणे आणि न्यायालयात उपस्थित राहून आलेल्या केसेस हाताळण्याची दिनचर्या असणाऱ्या वकिलाच्या छातीत न्यायालयातील पायऱ्या चढत असतांनाच अचानकपणे कळ आली आणि ते खाली कोसळले.यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ॲड.अंकुश पानतावणे वय ६४ वर्षे, रा.वकीलपेठ,नागपूर असे मृत पावलेल्या वकिलाचे नाव असून ते दोन दिवसांपूर्वी नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारांसाठी चंद्रपूरला गेले होते आणि त्याच रात्री चंद्रपूरहून नागपूरला परतले. त्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळी उठून चालायला गेले आणि दुपारी साडे बाराच्या सुमारास कुटुंब न्यायालयात गेले.न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावर पायऱ्या चढत असतांना त्यांच्या छातीत कळ आली व ते खाली कोसळले.त्यानंतर,प्राथमिक उपचार करून त्यांना रविनगरातील रुग्णालयात नेण्यात आले.परंतु, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. आज,गुरुवार २६ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता नागपूरच्या वकीलपेठ येथील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघून मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.घडलेल्या दुर्दैवी घटनेने वकील क्षेत्रासह इतर क्षेत्र शोकमग्न होऊन परिसरात शोककळा पसरली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!