Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअवकाळी पावसाची चाहूल; काही भागांसाठी पावसाचे 'यलो अलर्ट'..

अवकाळी पावसाची चाहूल; काही भागांसाठी पावसाचे ‘यलो अलर्ट’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एकीकडे उन तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा खेळ थांबू-थांबू सुरू झाल्याचे चित्र महाराष्ट्र राज्याच्या काही भागात मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे.गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह गारपीट झाल्याची नोंद आहे.अश्यातच लखलखत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असतांनाच दुसरीकडे अवकाळी पावसाची चाहूल लागली आहे.हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.यासोबतच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घेणे आवश्यक आहे.विशेषतः दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग,कोल्हापूर,सातारा घाट परिसर,सांगली,सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी,बीड,नांदेड, लातूर,धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.अवकाळी पावसामुळे आधीच उष्णतेचा सामना करणाऱ्या जनतेसमोर नवे आव्हान उभे राहिल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!