Thursday, June 25, 2026
Homeभंडाराग्रामपंचायत निधीची अफरातफर प्रकरणी ग्रामसेविका निलंबित मात्र अजूनही त्याच खुर्चीवर...!

ग्रामपंचायत निधीची अफरातफर प्रकरणी ग्रामसेविका निलंबित मात्र अजूनही त्याच खुर्चीवर…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-तुमसर तालुक्यातील राजापूर येथील ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग अंतर्गत मागासवर्गीय कल्याण निधी खर्च न करता निधीची अफरातफर केल्या प्रकरणी स्पष्ट झाल्याने ग्रामसेविकेला ७ ऑक्टोंबरच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले.मात्र,निलंबित होऊनही ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन मागील तारखांमध्ये देयके काढून घेत असल्याचा प्रकार सुरू आहे.यावर खंडविकास अधिकाऱ्यांनी कमालीचे मौन बाळगल्याने आश्चर्य होत आहे.
तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत राजापूर येथे १५ वित्त आयोगांतर्गत शालेय साहित्य खरेदी न करता साहित्याचे बिल ७ ऑगष्ट २०२३ तारखेला पेमेंट अदा केले.सदर साहित्य दिनांक-२९ फेब्रुवारी २०२४ तारखेला मुख्याध्यापकांना दिले असल्याने अनियमितता केल्याची नोंद अहवालात आहे.तसेच सन २०२०-२१ च्या जी.पी.डी.पी आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या बंदिस्त नाली बांधकामाचे स्थळ बदलून बांधकाम करणे,ग्रामपंचायत प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकीय मान्यता व मोजमाप पुस्तक नमुना २० नुसार सदर काम न करणे,स्थळबदल करण्याकरिता परवानगी घेण्याकरिता प्रकरण सादर न करणे,काम न करता देयकांची उचल करणे आदी पुराव्यावरून ग्रामपंचायत सचिव ए.जी.झोडे यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) १९६७ च्या नियम (३) चा भंग केल्याचा ठपका ठेवून शिस्तभंगाची कार्यवाही केली होती.त्यांचे निलंबन आदेश काढून मुख्यालय पंचायत समिती मोहाडी राहील; असेही आदेशात नमूद केले होते.मात्र, ग्रामसेविका झोडे त्याच ग्रामपंचायतीमध्ये नियमित येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!